Dr. Vaishnavi Uddhav Kumbhar BAMS, Ayurved Tadnya , Panchkarm Specialist
सुवर्ण अमृत प्राशनाची वैशिष्ठ्य
सुवर्ण प्राशनं होतन्मेधाग्नी बल वधणनम I
आयुष्य मंगलं पुण्यं वृष्य वण्यण ग्रहापहम I
मासात पर मेधावी व्याधधशिन्न च घृष्यते I
षडभिर्मासै: श्रुतधर: सुवर्णप्राशनाद् भवेत् ॥

सुवर्णप्राशन: आरोग्य आणि बुद्धीविकासासाठी अमूल्य आयुर्वेदिक संस्कार
सुवर्णप्राशनचे फायदे
- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी.
- बुद्धिमत्ता व विकास तसेच शारीरिक बल वाढवण्यासाठी.
- बुद्धिमत्ता व रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांमध्ये विशेष उपयुक्त.
- आयुर्वेदानुसार, सुवर्णप्राशन केलेल्या बालकांचे श्रवणशक्ती (एकपाठी) तसेच निरोगी जीवनमान होते.
सुवर्णप्राशन म्हणजे काय?
- सुवर्ण म्हणजे सोने आणि प्राशन म्हणजे सेवन करणे किंवा पाजणे.
- सुवर्णप्राशन हा लेहन प्रकाराचा एक भाग आहे. लेहन म्हणजे चाटवणे.
- बालकांना साधारणतः दर महिन्यात येणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन करणे प्रचलित आहे.
- जन्मापासून 12 व्या वर्षापर्यंत सुवर्णप्राशन करणे उपयुक्त मानले जाते.
सुवर्णप्राशनाचा परिणाम:
- बुद्धिविकास: सुवर्णप्राशन केल्याने मुलांची बुद्धिमत्ता वाढते.
- शारीरिक शक्ती: चांगली भूक लागते आणि शारीरिक ताकद वाढते.
- रोगप्रतिबंधक क्षमता: शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, ज्यामुळे मुलांचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
- आयुष्यमान व निरोगी जीवन: सुवर्णप्राशन बालकांसाठी मंगलकारक व पुण्यकारक मानले जाते.
सुवर्णप्राशनाचे पारंपरिक वर्णन (काश्यप संहिता):
- बालक जन्मल्यानंतर नाळ कापून, गळा स्वच्छ केल्यानंतर सुवर्ण, मध आणि तूप यांचे मिश्रण बालकास चाटवण्याची प्रथा आहे.
- सुवर्ण, वेखंड व बेल यांचे मिश्रण तुपासोबत चाटल्याने बुद्धिविकास, आयुष्यमान व आरोग्याचा लाभ होतो, असे काश्यप संहितेत वर्णन आहे.
सुवर्णप्राशनच्या घटकांचे महत्त्व:
- मध:
- सोन्याची राख व औषधी घटक वाहून नेणारा नैसर्गिक वाहक.
- शरीराला ऊर्जेचा स्रोत, पचन सुधारण्यासाठी उपयुक्त.
- गायीचे तूप:
- शरीरातील पोषकतत्व शोषून घेण्यासाठी मदत.
- रोगप्रतिकारशक्ती व पचन सुधारण्यासाठी उपयुक्त.
- ब्राह्मी:
- बुद्धिविकास, स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते.
- तणाव कमी करून झोप सुधारते.
- शंखपुष्पी:
- मेंदूचे कार्य सुधारून स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवते.
- तणाव, झोपेचे विकार व मानसिक आजारांवर उपयुक्त.
- अश्वगंधा:
- बुद्धिविकास, शारीरिक शक्ती व पचन सुधारते.
- हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त.
- यष्टिमधु (जेष्ठमध):
- श्वसन व पचन संस्थेसाठी फायदेशीर.
- पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.
- त्रिकटू:
- आले, काळी मिरी व लवंग यांचे मिश्रण पचन सुधारण्यासाठी वापरले जाते.
सुवर्णप्राशन व मंत्रोच्चार:
सुवर्णप्राशनाच्या वेली खालील मंत्रोच्चार केले जातात, ज्यामुळे या संस्काराचे शुभत्व वाढते:
ॐ भूः त्वतय दधामि।
ॐ भुवः त्वतय दधामि।
ॐ स्वः त्वतय दधामि।
ॐ भूः भुवः स्वः त्वतय दधामि।
प्रत्येक महिन्यात सुवर्णप्राशन (पुष्य नक्षत्राच्या दिवशी):
आयुष क्लिनिक (आगाशिवनगर) येथे सुवर्णप्राशन संस्कार नियमितपणे आयोजित केला जातो.
- संपर्क:
- 📞 9270059824 / 8983374099
- Website: www.ayushclinic.net
महत्त्वाची टीप:
आरोग्यासाठी आयुर्वेदाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. सुवर्णप्राशनासंदर्भात योग्य माहिती व सल्ला वैद्य किंवा डॉक्टरांकडूनच घ्यावा.
हा माहितीचा उपयोग आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवा व त्यांच्या आरोग्यविषयक विकासात हातभार लावा. धन्यवाद! 🙏
Suvarn Prashan
